महेश, शब्दांबाबत बेरजेचा दृष्टिकोन अतिशय योग्यच आहे.  इंग्रजी शब्द आपल्याला वाटते त्यापेक्षाही झपाट्याने मराठी होत आहेत असे वाटते. रिझर्वेशन, काउंटर, तिकिट, स्लिपर, बर्थ , कोच  ह्या शब्दांसाठी पर्याची मराठी शब्द सुचतीलही, सुचवता येतीलही. पण  सुचवलेले शब्द हे कितपत मराठी असतील?

आइस्क्रिमाबद्दल म्हणाल तर आइस्क्रीम हा शब्द माझ्यासाठी मराठी  झाला आहे कारण मी आइसक्रिमाच्या दुकानात गेल्यावर तिथल्या नानाविध आइस्क्रिमांना किंवा एखाद्या आइस्क्रिमाला आइस्क्रीमच म्हणतो. मला वेगवेगळ्या चवीची आइस्क्रिमे आवडतात. 

मिलिंद, टेबल, खुर्ची, कपाट, दप्तर, मेज ह्या शब्दांच्या उच्चारणाबाबत संदिग्धता नाही हा मुद्दा माझ्याही मनात आला होता आणि 'मुळात'चा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थही. तुमचे म्हणणे पटले.