मीराताई, लेख उत्तम जमून आला आहे. माहितीपूर्ण आहेच पण एका बैठकीत सर्व माहिती पचवता आली नाही. पुन्हा वाचेनच.

असो.

सुमारे १६-१७ वर्षांपूर्वी मला एक ग्वाटेमालातील विद्यार्थी भेटला होता. तो मोठ्या अभिमानाने शून्याचा शोध त्यांच्या पूर्वजांनी लावल्याचे सांगत होता. तेव्हा मी त्याला म्हटले होते की 'असे कसे होईल? शून्याचा शोध तर भारतीयांनी लावला. ' त्याला हा शोध भारतीयांचा हे माहित नव्हते. (तेव्हा माहिती इंटरनेटवर इतक्या सहज मिळत नव्हती. ) मला मायन संस्कृतीतील शोध माहित नव्हता.

एकंदरीतच जगाच्या नकाशावर जेव्हा शेती, पशुपालन, स्थापत्त्य, लेखन, भाषा, गणित यांचा विकास झाला तेव्हा तो पूर्व-पश्चिम वेगाने पसरला आहे आणि उत्तर-दक्षिण हळूहळू पसरला आहे. पूर्व-पश्चिम विकास लवकर होण्याचे कारण समान तापमान, हवामान, जमिनीचा कस, ऋतू, पाऊस इ. अनेक आहेत. अक्षांशात फारसा फरक नसल्याने लोकवस्ती आणि संस्कृती पसरत गेली. युरेशियाचा भाग पूर्व पश्चिम असल्याने तेथे विकास लवकर पसरला. म्हणूनच अनेक युरेशियन संस्कृतींनी गणितादी विषयांत प्रगती केली.

आफ्रिका, अमेरिका खंडात उत्तर दक्षिण आकारामुळे त्यामानाने विकास सर्वत्र झाला नाही. तो त्या त्या स्थानांपर्यंत मर्यादित राहिला. मायांचे शून्य जगाला माहित न होण्याचे हे ही एक कारण आहे.