अमेरिकेत एक बरं आहे की तिथे बसमध्ये कंडक्टर नसतो. ड्रायवरशेजारीच एक यंत्र असतं ज्यात आपण पैसे (आपलं, डॉलर किंवा सेंटस) टाकायचे. तुम्हाला ३ डॉलरचं तिकीट काढायचं असेल आणि ५ डॉलर टाकले तर २ डॉलर परत येत नाहीत. अमेरिकेत तिकीट काढल्यावर सुट्टे मिळत नाहीत, तेव्हा खेकसून का होईना आपल्या इथे कंडक्टर सुट्टे देतो हे भाग्यच समजावे, नाही का?