केवळ चालणेच नव्हे तर इतरही काही एकट्याने करण्याजोगी कामे करताना  असाच अनुभव येतो. आपोआपच स्वतःचा स्वतःशी संवाद सुरू होतो. मन अगदी हलके होऊन निरभ्र आकाशातल्या पतंगाप्रमाणे स्वैर संचार करू लागते. तेव्हा ते जगाचा वेध घेत असतेही आणि नसतेही. निर्वात स्थळी एखादा दिवा तेवावा तसे शांतपणे जळत राहावे, उजळत राहावे असे वाटते. आपण एका अक्षांशावर उभे असताना त्याच अक्षांशाच्या अनेक रेखांशछेदनबिंदूंवर किती विविध घटना घडत असतात. म्हटले तर एकाच पातळीवर, म्हटले तर अलग.

लेख आणि लेखनशैली आवडली हे वेगळे सांगायला नकोच.