वरवर छोटासा दिसला तरी प्रश्न गहन आहे खरा!

पण एक आई म्हणून मला तरी तुमचा निर्णय योग्य वाटतो. मुलगी लहान आहे, तिचे बालपण आपण सुद्धा एंजॉय करायचे असते.... आणि आत्ता नुसता तिच्या आवरण्याचा प्रश्न आहे, पुढे तिचा अभ्यास, पॅरेंटस मिटींग्ज, एखाद-दुसरा क्लास, प्रोजेक्टस... सगळे वाढत जाणार... त्यामुळे ऑफीसची टाईम कमिटमेंट थोडी कमी असल्यास अधिक चांगले. 

अर्थात तुमच्या नवऱ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण बरोबर आहे. खरे तर मुलगी अगदी तान्ही असतांना तुम्ही नोकरी करीत होतात आणि आता शाळेत जाऊ लागली तेव्हा सोडता आहात.

म्हणून दोन्हीतून सुवर्ण मध्य साधायचा म्हणजे.... ‍जरा घराजवळची, कमी टाईम डिमांडींग नोकरी शोधायची. मग ती भलेही थोडी कमी पगाराची किंवा कमी दर्जाची (कामाच्या क्वालीटी बद्दल म्हणतेय) का असेना!