केवळ मुलीला शाळेत सोडण्यासाठी इतर पर्याय व्यवहार्य नसल्याने हे केले असेल तर कदाचित आपले चुकले की काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. परंतु ही संधी मानून मुलीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि शिकवण्या/क्लास यांच्याऐवजी स्वतः अभ्यास घेतला तर पुढे हा निर्णय घेतल्याबद्दल अभिमान वाटेल. १९८० च्या सुमारास एका कुटुंबातील वडिलांनी नोकरी सोडून (आईची नोकरी सुरू होती) मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. मुले उत्तम शिकली (एक मुलगा बोर्डात आला होता). या आईवडिलांची मुलाखत त्यावेळी "माणूस"(साप्ताहिक की पाक्षिक? ) मध्ये आली होती असे आठवते.

त्यामुळे आजच निर्णय बरोबर की चूक हे तुम्ही या निर्णयाला एक संधी मानून त्याचा काय फायदा घेता यावर ठरेल.

विनायक