मी सुद्धा अश्याच परिस्थितीतून गेलेलो आहे आणि जातो आहे. मला नाही वाटत की हा मुद्दा कोण चुकले एवढाच आहे. ह्याला नक्कीच दोन बाजूआहेत. आपला नवरा जे म्हणतो आहे ते नक्कीच चुकीचे नाही जर आपली आर्थिक परिस्थिती खूप जास्त खराब होत असेल तर. पण जर ती आपण म्हणता त्या प्रमाणे उत्तम असेल तर आपल्या नवऱ्याचे नक्कीच चुकते आहे. पैसा आणि भावना ह्या दोन बाबीची तुलना होऊ शकत नाही आणि कुणी करू पण नये.

तुम्ही जेव्हा नोकरी करून मुलीच्या शाळेची काळजी घ्यायला तयार आहात तेव्हा तुमच्या नवऱ्याने कौतुकाने स्वीकारले पाहिजे. थोडे पैसे कमी येतील
घरात पण तुमचे बाळ खूश राहील आणि त्याची प्रगती पण उत्तम होईल असे मला वाटते. बाळाला ह्या वयात पैश्या पेकशा आई जास्त महत्त्वाची आहे आणि त्यापेकशा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा दोन वर्षाने पण कमावता येईल, पण बाळा चे हे दिवस परत येणार नाही.

घरच्या सगळया लोकाना सोबत बसवून विषय चर्चेस घ्या. काहीतरी पर्याय निघेल.