नमस्कार मृचंपा,

तुम्ही मनात न ठेवता कुठेतरी आपली भावना व तणाव व्यक्त केलात हे पाहून आनंद वाटला ! प्रत्येक वेळी आपल्याच माणसाजवळ बोलले पाहिजे असे काही नाही, बरेच वेळा आपण त्रयस्थासमोर जास्त मनमोकळे बोलू शकतो... पण  मनात न राहता बाहेर येणे महत्त्वाचे आहे.  व्यक्त भावनांपेक्षा अव्यक्त बोलांमुळे प्रॉब्लेम्स जास्त ताणले जातात..

आणि, आम्ही सारे मनोगती ह्याकडे त्रयस्थ दृष्टीकोनातून पाहून लिहित असल्याने योग्य काय आहे ते आपल्याला स्वतःलाच निवडून पारखून स्वतःची समजुत घालावी लागेल, (ज्याच जळतं त्यालाच कळतं म्हणतात ना... अगदी तसचं )

म्हणून मी शेवटी ही नोकरी सोडली

तुम्ही नोकरी सोडली, (ती नवऱ्याशी बोलून सोडलीत की स्वतःहून निर्णय घेतलात ?) -- समजा योग्य चर्चा करून मग एकाचा हो दुसऱ्याचा नाही म्हणत म्हणत नोकरी सोडली असेल तर ठीक आहे, पण सर्वस्वी स्वतःचा निर्णय असेल तर जरा कम्युनिकेशन गॅप कमी करता आली तर पहा.. आणि जर बोलून सोडली असेल तर आई म्हणून तुमचा निर्णय योग्य वाटतो...खरं सांगू तर आई आणि बाई म्हणून सुद्धा - कारण घर जपणं आणि सांधणं हे  स्त्री इतके कोणालाही चांगले जमत नाही... अगदी पुरुष १००%  घरातली सगली काम  करत असला तरी त्यामध्ये घरातल्या स्त्री सर येत नाही.

घराचे हप्ते भरणे सहज शक्य आहे इतका पैसा माझा नवरा कमावतो.

उत्तम, ऐकून आनंद वाटला, दैनंदीन जिवनात लागणाऱ्या सगळ्या गरजा पुर्ण होत असतील,

पण मृचंपा, तुम्ही क्रिकेट पाहता का हो ? ते नाही का, ४ ओव्हर ३० रन, मग २ ओव्हर २० रन .. असे करत करत रन-रेट वाढत जातो ना तेंव्हा टेंशन येत...  !!  दोन पगार चालू असतील तर रन रेट कमी वाटतो आणि मॅच आरामात जिंकता येते..  !! म्हणजे युवराज सिंग सारखा दम असेल तर ३६ चा रनरेट ने सुद्धा जिंकू शकतो.. पण ९५% टक्के लोकांना आजही द्रविड आवडतो.. कारण तो स्लो ऍंड स्टेडी खेळून प्रेशर न वाढवता मॅच जिंकायच्या दिशेने जातो  !!

-- तसच काहीस संसारचं पण, तुमच्या ह्या वाक्यापेक्षा दुसरा निर्णय चांगला आहे की पर्यायी जवळची नोकरी शोधणे.... आणि मिळेल... जहाँ चाह... वहाँ राह.... ! ईच्छा तिथे मार्ग !   फक्त मग ईंजिनियर हे सर्टिफिकिटाचा अहंकार आणि त्या हिशेबात पगार हे थोड ऍडजस्ट करावं लागेल... मुलीला आनंदाने तुमच्या कुशीत येताना पाहुन... जमेल हळू हळु... !

बघा, मी प्रयत्न केला... बाकी तुम्ही स्वतः सुज्ञ आहातच... आणि लवकरच आम्हाला असे कळेल की ( ...... & they lived happily ever after...... )

--

आशुतोष दीक्षित.