लेख उत्तमच आहे. श्री. रामदास यांची आठवण झाली. पण या सर्व लेखनात सुजुकीचा उल्लेख कसा काय वगळला गेला?

मारुतीच्या रंगाविषयीची एक कथा आठवते. मारुतीसाठी नेरोलॅकला रंगसंयुगांचे एक खास मिश्रण बनवावे लागले होते. कारण तोवरच्या नेहमींच्या रंगांनी सुजुकीच्या जपानी तंत्रज्ञांचे काही केल्या समाधान होत नव्हते.भारतीय पर्यावरणास साजेशी हवी ती चमक आणि टिकाऊपणा हे दोन गुण एकाच मिश्रणात मिळवण्यासाठी नेरोलॅकने जंग जंग पछाडले आणि त्यातूनच नेरोलॅकच्या पर्यावरणानुकूल रंगांच्या श्रेणीचा उदय झाला असे म्हणतात. सत्यासत्यता पडताळलेली नाही. तसेही, मारुती आज एक दंतकथा बनून राहिलेली आहेच.