मला आपल्या मातृभाषेत विशेषणा नंतर 'पणाची' प्रत्यय लावल्यास सहसा विषय व्यक्ती कडून व्यक्तीच्या कृतीकडे लक्ष वेधतो असे वाटले
".... यांची ..... कृती ..... पणाची आहे"  असे वाक्य कठोर टीकात्मकही झाले पाहिजे पण असभ्य अथवा असांसदीय नको या करिता विशेषणे सुचवणे अथवा कठोर टिका करण्याकरिता इतर मार्ग सुचवा .

खालील शब्दप्रयोग गूगलच्या साहाय्याने शोधले त्यातील कोणते संसदीय आणि कोणते असभ्य ते निवडण्यास मदत करावी हि विनंती

'मी' पणाची ,बालिश पणाची,हलकट पणाची,नीच पणाची,"वेगळे"पणाची,कमकुवत पणाची,बेबंद पणाची,खोटे पणाची,क्षुद्र पणाची,असमजूतदार पणाची,'झोपाळू'पणाची वृत्ती,'ढ' पणाची ,'कृष्ण'पणाची,अपराधी-पणाची,खवट पणाची.

इतर टीकात्मक वाक्य प्रयोग

बेजबाबदार पणाची हद्द ,परिसीमाच उरली नाही,सवंग पणाची पातळी ओलांडली,प्रामाणिक पणाची शंका येते

प्रतिसादांची विनंती