विशेषण न वापरता केवळ 'पणा' लावल्याने मूळ विशेषणाच्या संसदीयत्वात (सभ्यतेत) फरक पडेल असे वाटत नाही. (सभेत बोललेले चालते ते सभ्य ... संसदीय अशा अर्थाने)

..... हे अमूक आहेत असे म्हणणे किंवा ...... ह्यांचे .... हे म्हणणे अमूकपणाचे आहे ... ह्या दोन्हींच्या सभ्यतेत गुणात्मक फरक वाटत नाही.

शिवाय कठोर टीका केवळ शब्दांच्या निवडीतून होईल / होणार नाही हेही कठीण वाटते. मांडल्या जाणाऱ्या मुद्द्याच्या गुणात्मकतेवर सर्व अवलंबून आहे असे वाटते.

व्यक्तीकडून कृतीकडे रोख वळवायचा असेल तर,

"....अशा वेळी ....असे म्हणणे/वागणे एखाद्याला .... पणाचे वाटण्याची शक्यता आहे .... " असे काहीसे वाक्य बनवावे लागेल असे वाटते.