स्त्रियांची नोकरी म्हणजे , "असून अडचण , नसून खोळंबा" या प्रकारात येते , असं मला वाटतं. शिक्षणही चागल्या दर्जाचं घेतल्याने नोकरी
केली तरी त्रास नाही केली तरी त्रास, अशी अवस्था स्त्रीची होते. मुलांनाही त्यांच्या कोवळ्या वयात आपण शिक्षण नावाच्या जोखडाला बांधत
असतो. परंतु ही सगळी सामाजिक परिस्थिती बिघडत (की विकसित ? ) आली असल्याने आपल्याला मागे फिरणं शक्य होत नाही. सदैव
सैनिका पुढेच जायचे... हेच होतं. आपल्या भोवतालच्या समाजाची दृष्टीच काहीशी वेगळी झालेली आहे. "एवढं शिकून ही घरीच का आहे "?
असं म्हणणारेही खूप आहेत. पण एक गोष्ट मात्र अजूनही त्रिकालाबाधित आहे, ती म्हणजे स्त्री घरी बसली तर फारसं वावगं वाटत नाही. मुलं
वाढवणं हे स्त्रियांचच काम आहे असं अजूनही मानलं जातं. त्यामुळे आपण घरी राहिलात तरी कुजबुज होणार नाही. आपली आर्थिक परिस्थिती
जर चांगली असेल तर (पाळणाघरात ठेवणं हा उपाय आहेच) आपला निर्णय योग्य वाटतो. तसेच बऱ्याच मनोगतींनी आपण घराजवळ नोकरी
पाहावी असं, म्हंटलं आहे हेही करून पाहायला हरकत नाही. .... पण पुरूष घरी बसला तर वाटेल त्या वावड्या उठवल्या जातात. माझ्या एका
मित्राने मुलीच्या शिक्षणासाठी चांगली (? ) सरकारी नोकरी खूप लवकरच सोडली आणि तो घरी बसला. त्याची बायको चांगल्या नोकरीत होती.
मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्याने तिला चांगली शैक्षणिक पात्रता मिळवून दिली. आज ती चांगल्या पदावर आहे. पण त्याच्याकडे मात्र
आजूबाजूचे लोक "ह्याने काहीतरी भानगड केली आहे, म्हणून ह्याला घरी बसवला आहे असं अजून समजतात. त्याच्या बायकोलाही ते
काहीतरी मसालेदार बातमी साठी अडून अडून विचारी त असत. आपली सामाजिक वृत्तीच अशी आहे , त्याला काय करणार ? त्यामुळे तुम्ही
नोकरी सोडून मुलीसाठी घरी बसलात तरी आजूबाजूच्या लोकांचं काही बिघडणार नाही. कारण स्त्री घरी बसली ही मसालेदार बातमी होऊ
शकत नाही. आपला निर्णय योग्य आहे, फक्त तो शक्यतोवर घरातल्या लोकांच्या संमतीने घेतला असल्यास , आपल्याला त्रास कमी होईल.