दशमान बिंदू एक स्थान अलीकडे आल्यामुळे गणित चुकून पर्जन्यजलाची उपलब्धता कमी दाखवली गेली हे खरे. पण या जास्तीच्या पाण्यामुळे साठवणूकक्षमतेचा युक्तिवाद अधिकच भक्कम झाला. इमारतीच्या भूखंडामध्ये प्रत्यक्ष बांधकामाव्यतिरिक्त उपलब्ध जमीन कमीच असते. त्या जागेत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या (गच्चीवर असतात त्या वेगळ्या), मलनिस्सारण टाक्या, गॅसनलिका, विद्युत उपवाहिन्या, टेलिफोनसंदेशवाहिन्या यांचे जाळे असते. त्यामुळे भूगर्भांतर्गत या पाणीसाठ्याची साठवणूक कठीणच आहे.

रेनवॉटर, हार्वेस्टिंग,बोअरवेल, रीचार्ज हे शब्द आणि संकल्पना चांगल्या परिचयाच्या म्हणजे ठाऊक आहेत.

आपल्याला व्यवहार्य हा शब्द ठाऊक आहे का?

पर्यावरणानुकूल संकल्पना राबवणाऱ्या 'ऑर्किड'(जे ठाऊक आहे,)ची दमछाक होते आहे असे ऐकीवात आहे.