रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या मदतीने आवारातील बोअर वेल रीचार्ज करता येते हे ठाऊक आहे का आपल्याला?

'काही खुलासे' या आपल्या प्रतिसादातील हे वाक्य आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते?

'....उ़न्हाळ्यात जिथे टँकर मागवावा लागतो तिथे चौकशी करून पहा'

या आपल्या वाक्यातील गर्भित सूचना(इन्स्ट्रक्शन) आणि आदेशाविषयी आपल्याला काय  वाटते?

असो.  संस्थळावरचे लेखन हे विरोधी आणि बाजूने अशा दोनही प्रतिक्रियांना पात्र असते. मतभिन्नता आणि प्रतिवाद होणारच. सर्व संस्थळांवर लेखनाचे संपादन होते आणि अयोग्य वाटलेले लिखाण उडवले जाते. पुन्हा असो.

अवांतर : पण खरे तर अवांतर नव्हेच  सध्या मुंबईत तरी कुठलीच इमारत चार मजल्यांइतक्या कमी उंचीची बांधली जात नाही. बहुतेक सर्व गगनचुंबी मनोरे असतात. त्यामुळे संचित पर्जन्यजलाचा वरील गणितातला  पुरवठा कालावधी ड्रास्टिकली (घसघशीतपणे?)कमी होणार.