गझल ठीक आहे. वृत्त निभावून नेलाय. पण "ग़ज़लियत" फारशी नाही. त्यामुळे गझलेच्या साच्यातली कविता वाटतेय.
विवेचन अधिक आणि धक्का कमी त्यामुळे असे वाटताय. शेर गोटीबंद असला पाहिजे. सानी मिसरे अधिक प्रभावीपणे लिहिण्यावर मेहनत घ्या. नुसती काफियाची यादी करून शेर तयार करू नका.
योग्य मेहनत घेतलीत तर तुम्ही चांगली गझल लिहू शकाल असे वाटते.
खट्याळ