शासकीय दूरदर्शन होते तेव्हां पैसा शासनाकडून यायचा. त्यावेळी समाजाचे शिक्षण हा एकमेव दृष्टिकोन ठेऊन चॅनल चालवणे शक्य होते. आता त्या बाजाराच्या 'मागणी तसा पुरवठा' तत्त्वावरच चालणार. लोकशाहीत 'जशी प्रजा तसा राजा' तसेच बाजारात 'जे खपते तेच विकायला येणार'. भंपक समाजात भंपक मालिकाच यशस्वी होणार.  अभिरुची वाढावी म्हणून काढलेले सिनेमा आठवडाभरही चालणे मुष्किल. पण टुकार सिनेमा मात्र महिना महिना सहज चालतात. तेव्हां निव्वळ माध्यमांना दोष नाही देता येणार.

उच्च अभिरुचीच्याच बातम्या लोकांना आवडायला लागल्या तर त्यांचेही पीक भरघोस येईलच.