नमस्कार, आपण दोघंही जे म्हणत आहात हे मला लक्शात आले आहे पण असं असू शकत नाही का की वर्तमान पत्र असो वा वाहिनी असो, सतत तेच तेच दखवल्यामूळे लोकांना दुसरा काही पर्यायच नाही राहिलेला. सगळाच समाज हा काही ह्या अश्या बातम्यांच्या पाठी धावणारा नाही आणि मूळात माझा मुद्दा हा होता कि पत्रकारितेत नक्की कशाला जास्त महत्त्व दिलं जात आहे. अभिरुची बद्दल बोलायचे झाल्यास बरेचसे सिनेमे (हिंदी वा मराठी उ. दा. स्वदेस, वेडनसडे, नटरंग, बालगंधर्व, तार्यांचे बेट, काकस्पर्श इत्यादी आणि ज्याचा त्याचा विठोबा, व्हाइट लिली आणि नाइट रायडर सारखी नाटके) आणि नाटके सध्या लोकांनी डोक्यावर घेतले आहेत. म्हणजेच जर चांगलं दाखवायचं ठरवलं तर लोक काही त्याकडे अगदिच पाठ फिरवत नाहित. त्यामुळे इकडे लोकांना दोश देण्यात काही अर्थ नाहि. जसे वर म्हटले तसे, कोणत्या बातम्यांना किती महत्त्व देणे हे मुळात पत्रकाराचे कर्तव्य आहे आणि त्यानुसारंच लोकांचे विचार बदलणार आहेत. तरिही मी आपल्या विचारांचा आदरंच करतो आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार.