मी गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत राहतोय, मला भावलेली अमेरिकन लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये...

१. सार्वजनिक ठिकाणी जागोजागी दिसून येणारे सौजन्य -उदा. कुठल्याही इमारतीच्या आत वा बाहेर शिरताना ढकलायचा दरवाजा असेल अन जर इतर कुणी येताना दिसत असेल तर तो धरून ठेवणे. अनोळखी माणसाला ही अभिवादन करणे.

२. आपल्या कामाशी काम ठेवणे, मागितले नसताना सल्ले न देणे

३. विश्वास ठेवण्याची सवय - सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला जातो जसे काही ठिकाणी लहान मुलांसाठी असलेल्या बाबा गाड्या एका ठिकाणी सोडून पुढे जावे लागते. पण लोक बिनधास्तपणे गाड्या सोडून जाऊ शकतात.

४. जागोजाग पाळली जाणारी शिस्त

५. इतरांविषयी सहिष्णुता

६. अवघड परिस्थितीतही रडगाणी गाणारी अमेरिकन माणसे मला आजवर दिसली नाहीत.

७. बहुतांश ठिकाणी राखली जाणारी स्वच्छता.

८. कामाच्या बाबतीत स्पष्टवक्तेपणा - केवळ समोरच्याला खूश करण्यासाठी एखाद्या कामाला हो म्हणणे, शक्य नसतानाही कमी वेळेत काम करून देण्याचा शब्द देणे या गोष्टी आढळत नाही.

खटकलेल्या काही गोष्टी -

१. रस्त्यावरील वाहनांना ध्वनिप्रदूषणाचे शिथिल नियम

२. कागदांचा व छापील माध्यमांचा अतिरेकी वापर

अजूनही बऱ्याच गोष्टी सुचतील, तूर्तास एवढेच.

पुढील लेखनास शुभेच्छा!!