एका महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यावर फारच मार्मिक भाष्य आहे.

वैयक्तिकरीत्या मला या प्रक्रियेत कळायला लागल्यापासून कधी सहभागी व्हायची संधी मिळाली नाही त्यामुळे इतरांचे अनुभव ऐकून व वाचूनच याबद्दल ज्ञान मिळाले.

मला प्रचंड तिटकारा असणारी गोष्ट म्हणजे, उपवर मुलग्यांचे निर्व्यसनी असल्याबाबत होणारे अवाजवी कौतुक. वर्तमानपत्रातल्या जाहिरातींमध्ये बहुतांश उमेदवार निर्व्यसनी असल्याचे लिहिले जाते. किती वेळा ते खरे असते हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

तर मुद्दा असा, जे मुलगे १००% निर्व्यसनी आहेत त्यांनी याबाबत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे कारण काय?

कुठलेही व्यसन हे जगण्यास आवश्यक नाही, त्यामुळे त्यापासून दूर राहणे अजिबात अवघड नाही.

अन कुणी निर्व्यसनी राहिले असेल तर म्हणून काय कुटुंबावर, समाजावर उपकार केले आहेत का? ती गोष्ट बहुतांश वेळा त्याच्याच फायद्याची असते त्यात एवढे कसले मैदान मारले?

अजूनतरी मुलींबाबत असे लिहायची व बोलायची वेळ आलेली नाही हे समाजाचे भाग्य!!