...हायकू बऱ्या वाटल्या. उलट्या क्रमाने* आवडल्या. म्हणजे, तिसरी सर्वात जास्त भावली**, त्याखालोखाल दुसरी बरी वाटली. पहिली ठीकठीक - म्हणजे तशी बरी आहे, पण हृदयाला स्पर्श वगैरे काही करून गेली नाही. असो चालायचेच***.



तळटीपा:

*यास 'चढत्या भाजणीने' असेही म्हणता आले असते, पण मग त्यातून 'म्हणजे पहिलीही थोडी का होईना, पण आवडली' असा अर्थ ध्वनित झाला असता; म्हणून हात आवरता घेतला.

**'लहान माझी...'मधली नव्हे. शुद्ध मराठीत सांगायचे, तर 'अपील झाली'.

***आमची टेस्ट अशी, त्याला काय करणार?