>ह्या माझ्या निर्णयाला माझ्या नवऱ्याचा तीव्र विरोध आहे. तो त्यावरून मला खूप बोलत असतो. त्याचे म्हणणे आहे की काही ना काही मार्ग काढून नोकरी सुरूच ठेवायची.
= हल्ली नवऱ्यांना बायको कमावतीही हवी आणि गृहकृत्यदक्ष पण हवी, तो वेडेपणा आहे, यात पत्नीच्या आयुष्याची फरपट होते, फार कमी स्त्रिया नोकरी सोडू शकतात.
आता तुमचा प्रश्न : ह्या माझ्या निर्णयाला माझ्या नवऱ्याचा तीव्र विरोध आहे.
इथे सर्वांनी तुम्हाला दुजोरा दिला तरी काही उपयोग नाही, तुम्ही पतीशी कसा सुसंवाद साधणार ते कौशल्य आहे. मुलगी पाचवीत गेली की बरीचशी स्वयंपूर्ण होते, तिचा डबा करून दिला की मग फारसं काही बघावं लागत नाही तस्मात, पतिराजांना मी त्या वेळी नोकरी परत सुरू करेन असं सांगा.
सगळ्या न सुटणाऱ्या प्रश्नांना एकमेव उत्तर म्हणजे 'पुढचा वायदा' सगळे राजकारणी आणि ज्योतिषी हीच ट्रिक वापरून यशस्वी होतात (पण नवऱ्याला हे सांगू नका)