मे महिन्याच्या दुपारच्या तलखीत घरी उगी पडून राहायचं सोडून भदे अगतिकपणे चाळीचा जिना उतरले. मुलीच्या लग्नात वरदक्षिणेसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते दरमहा ते फेडत होतेच, पण त्याच नरपुंगव जावयाची लाचखोरीबद्दल तुरूंगात रवानगी झाल्याचं ऐकून त्यांच्यासारखा खंबीर माणूसही क्षणभर गांगरला होता. 'सुख उणावतं, दु:खं दुणावतात' असं एक शालेय अवतरण त्यांना उगीच आठवलं. सोपी वाटतील अशी कोडी आपल्याला कधीच का पडत नाहीत, असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा, मनोमन त्या सर्वोच्च लवादापुढे मांडला.
(कोडे लवकर सुटल्याने हा वायफळ उपद्व्याप) :)