मनोगतींनो,
गाणे सोपे असूनही सहभागी झाले बद्दल आभार.
(आणि जे आणखी सहभागी होतील त्यांचेही आगाऊ आभार)
उत्तर बरोबर आहे हे वेगळे सांगायची गरजच नाही.
पण, मी हे गाणे भाषांतरित करायचा गेले वर्षभर प्रयत्न करीत होतो आणि मनात होते की
१५ ऑगस्टच्या "मुहूर्तावर" मनोगतवर प्रकाशित करायचे.
सुदैवाने, ते जमले आणि म्हणून मग हा सगळा उपद्व्याप. इतकेच.
गाणे ओळखायला सांगणे हे यात गौण होते असे म्हणायला हरकत नाही.
पण हो , यामुळे तुमच्या सहभागाचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही, माझ्यासाठी!
पुन्हा एकदा धन्यवाद....
.कृष्णकुमार द. जोशी