आपण बरोबर निर्णय घेतला आहे. दोघेही नोकरी करत असताना मुलांकडे दुर्लक्ष होतेच. आम्ही आता साठीला आलो आहोत. पण या मुळे पोळलेलो असल्यामुळे अनुभवाने सांगू शकतो. आमचा अनुभव  वैयक्तिक असल्याने मी विस्ताराने सांगू शकत नाही. पण एवढे सांगतो की आमच्या दोन मुलांपैकी एकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता गांठीला भरपूर पैसा आहे. पण त्याचे पुनर्वसन आता अशक्य आहे. तुमच्या मिस्टरांना आमचे हे मत जरुर सांगा. त्याहून मुलगी मोठी झाल्यावर तुम्हाला जवळची नोकरी मिळेलच.