सर्वसाक्षी, आपल्याच प्रमाणे शिव शाहिरांची 'राजा शिव छत्रपति' व्याख्यानमाला अनुभवण्याचे भाग्य मला शिव शाहिरांच्या पन्नाशीत व माझ्या
लहानपणी मिळाले होते. सन १९७१ च्या सुमारास भारत पाक युद्धाच्या ऐन धामधुमीत ही व्याख्यानमाला उस्मानाबाद येथे आयोजित केली होती.
त्या वेळी बाबासाहेबांच्या ओघवत्या वाणीला वेगळीच धार आली होती.
त्यावेळी त्यांनी केलेले नकाशासहित विवेचन, प्रत्येक मुद्द्यास दिलेले आधार, शिवप्रभूंवर वाक्यागणिक जाणवणारे प्रेम व निष्ठा हे अजूनही
४० वर्षांनी जशास तसे आठवते. विषेशतः युद्धात भारत विजयी झाल्याचे त्यांनी व्याख्यानात जाहिर केले, त्या वेळी त्यांना व श्रोत्यांना झालेला
आनंद तर शब्दातीत होता.आजही त्या आठवणी रोमांचित करतात.
त्यांना वडिलांनी घरी बोलावले होते व ते निमंत्रण स्वीकारून आमचे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी " राजा शिवछत्रपती " च्या दोन्ही
खंडांवर मोडी लिपीत दिलेली स्वाक्षरी अजून माझ्या संग्रही आहे.
नुकताच त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्त बाबासाहेबांना मानाचा मुजरा.
जीवेत शरदः शतम !