उत्तरः आयेगा आनेवाला.....(कुमुद गांगुली, मुमताज जहाँ बेगम दहलवी, महल, खेमचंद, नक़्शाब, आनंदघन)

१.
"नौका" या शब्दाची द्विरुक्ती टाळण्यासाठी, असे म्हणता येईलः (दुसरे कडवे तिसरी ओळ)
"तारू कधी मनाचे न कळे तटास पोचे "
(लिंगभेद जरी झाला, तरी अर्थ तोच राहतो... आणि अधिक महत्त्वाचं, वृत्तात गणदोष येत नाही.)

२.
"पथहीन आज यौवन" च्या ऐवजी "तारुण्य भरकटूनी" हेच जास्त, च्यापेक्षा बरोबर गेय आहे.

असो.
भाषांतर (खरंतर मला भावांतर म्हणायचंय) फस्किलास झालंय......म्हणजे अभियांत्रिकीच्या भाषेत सांगायचं झालं तर
ऑप्टिमम शब्द वापरलेत तुम्ही. नॉट अ पेनी लेस नॉट अ पेनी मोर........ ‍झक्कू भावा........

(च्यामारी तुम्हाला "टवाळ" का म्हणायचं म्हणे? की हल्ली प्रतिभावंतास "टवाळ" म्हणतात. नाव बदलता येत असेल तर बघा बुवा... )