माझ्या भावना आपल्या सर्वांहून वेगळ्या नाहीत ! शेवटचा भाग लिहिताना हा असा शेवट करायला नको असे राहून राहून वाटत होते पण त्यामुळे कथेशी प्रामाणिक राहिल्याचे समाधान मिळाले नसते.
विवेक हे एक कथेतले पात्र आहे, तर 'वन फॉर द रोड' ही एक प्रवृत्ती ! सुखी शेवटच द्यायचा असता तर अस्थिविसर्जना नंतर परतून येताना विवेकला हॉटेल मध्ये बसून दारू ढोसताना दाखवलेच नसते व त्या ऐवजी शेवट एक गुलाबी करता आला असता.....
कोणत्याही लेखकाला स्वतःच्या कथेचा दुःखद शेवट हा क्लेशकारकच असतो व नेहमीच सुखांत कथा मन जिंकून जातात पण मग वाचकांना प्रवृत्ती कश्या अनुभवायला मिळतील ?
माझेही मन ह्या शेवटाला 'नकोसा शेवटच' म्हणत राहील परंतू माझा नाईलाज होता-
धन्यवाद !