टवाळराव, "..."चा अनुवाद "पडती फार काळजी" पटला नाही.
मिलिंदराव, येथे जशास तसा अनुवाद नाही हे बरोबर. मूळ गाण्यात ध्वनिसाधर्म्यावर आधारित श्लेषासारखी शब्दचमत्कृती यमकाद्वारे दोन ओळीत वापरलेली आहे. त्यासाठी हिंदीतल्या वाक्प्रचारांचा उपयोग केलेला आहे. हे सगळे मराठीच जसेच्या तसे जमले असते तर नको होते असे नाही. पण निदान ही शब्दांची गंमत मराठीत साधावी ह्या उद्देशाने 'प्रेम म्हणजे चेष्टा नाही, त्याची आग/जोखीम मनापासून असावी लागते ... ' असा काहीसा अर्थ यावा अशा उद्देशाने थोडा गोषवाऱ्याने अनुवाद केलेला आहे.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहेच. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.