आता, हे गाणे भाषांतरासाठी आधीच येऊन गेले असल्यामुळे ध्रुवपदासकटचे भाषांतर देत आहे. प्रतिक्रिया यावी ही अपेक्षा.
स्मृती त्या तुझ्या मी पुसाया निघालो
जणू मीच माझ्या विनाशा निघालो...... ॥ध्रु॥
ढगांनो तुम्ही आज या सोबतीला
पुन्हा अश्रु ढाळावया मी निघालो........१
जिथे कैकदा पाहिली प्रेमस्वप्ने
तिथे भस्म होण्यास हा मी निघालो......२
जळो दुःख-अग्नीत हे स्वत्व माझे
मनी शांत होण्या असा मी निघालो......३