आणखीही काही कारणे आहेत असे मला वाटते.
मनोगतावर
लिहिणाऱ्यांपैकी फारच थोडे लोक ’लेखक’ म्हणण्याच्या योग्यतेचे आहेत.
बरेचसे माझ्यासारखे हौस म्हणून लिहिणारे आहेत. ती हौस पुरी झाल्यावर
लिहिण्यात रस नाही किंवा ती प्रतिभा (प्रतिभा शब्दही चुकीचा आहे.) आटली
किंवा ती क्षमता संपुष्टात आली
असे झाले. त्यानंतर ’मी लिहीत नाही तर कशाला जायचे’ असा विचार बऱ्याच
जणांनी केला असावा.
शिवाय मनोगत अस्तित्वात आले २००४ साली. तेव्हा
फारच थोडी संकेतस्थळे अस्तित्वात होती. गेल्या काही वर्षात संकेतस्थळांची
संख्या खूप वाढली. वैयक्तिक ब्लॉग्ज आले. मित्रमंडळींना भेटण्यासाठी ऑर्कुट,
फेसबुक आले. त्यामुळेही मनोगताची गरज फारशी वाटेनाशी झाली. हे मुद्देही लक्षात घेण्यासारखे आहेत.