निष्कपट चर्चा ह्या सदरांत घडून यावी असे माझे 'मनोगत' होते पण काही अपरिहार्य कारणांनी मला हा प्रतिसाद (सूचना / विनंती ) द्यावासा वाटला !
विविध संकेतस्थळांवर 'ग्रुप्स' आहेतच. ग्रुप्स चा मॉडरेटर त्याच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असतो. अर्थात आपले प्रशासक पण दक्ष असतातच ! सदस्य (काही ग्रुप्सवर) प्रतिसाद मॉडरेटर च्या मार्फतच देऊ शकतो अशी व्यवस्था केलेली असते.
काही कोत्या मनोवृत्तीच्या सदस्यांनी मनोगत वर हैदोस घातला आहे. त्यांच्या पोरखेळांना आळा घालण्यासाठी त्यांचे प्रतिसाद तसेच लेखन प्रथम प्रशासकांनी तपासले व नंतरच त्याला प्रसिद्धी दिल्यास असल्या मनोवृत्तीमुळे प्रामाणिक सदस्यांना त्रास होणार नाही किंवा नवीन सदस्य झाल्यावर सुरुवातीच्या काही प्रतिसादांची मर्यादा नक्की करावी.
इ-मेल आयडी उघडणे सोपे आहे त्यामुळे असले सदस्य अनेक नावांनी सर्वदूर वावरत असतात. अधुनमधुन (किंवा संशय आल्यास ) त्यांनी दिलेल्या मूळ इ-मेल पत्त्यावर ट्रायल मेल पाठवून शहानिशा करता येईल. मनोगत चे आयडी मिळावे म्हणून जर खोटे मेल आयडी इतरत्र उघडलेले असल्यास मनोगत चे आयडी मिळाल्यानंतर त्या मेल आयडी ची आवश्यकता भासणारच नाही हे माझ्या चांगलेच लक्षात आले आहे. ट्रायल मेल ला उत्तर न आल्यास प्रशासक त्यांना वाटेल ती कारवाई करण्यास समर्थ आहेतच.
प्रामाणिक मनोगतींना माझ्या उद्देश्याबद्दल शंका येणार नाहीच व अशी व्यवस्था केली गेल्यास हरकत ही ते घेणार नाहीत. अप्रामाणिक सदस्यांना मात्र मनोगतला सोडचिठ्ठी द्यावी लागेल ज्यामुळे प्रशासकांचा बराचसा भार हलका होईल.
ही सूचना देण्याची वेळ येथे आल्याबद्दल मलाच वाईट वाटत आहे परंतू मनोगतवरील सध्याचे प्रश्न पाहता हा उपाय रामबाण सिद्ध होईल अशी आशा वाटते.
अजित