मनोगतावरच्या शोधयंत्राकडून तुम्ही गूगल प्रमाणे अपेक्षा ठेवलेली आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. ह्याकामासाठी संपूर्ण मजकूर 'सूचिबद्ध' करावा लागतो. असे केल्याने तुम्ही म्हणता तसा शोध घेणे शक्य होते. देवनागरीसाठी असे करणे तत्त्वतः शक्य आहे, मात्र डेटाबेसची ठेवण तशी बदलणे हे सेवादात्याने केवळ त्यांच्या हातात ठेवलेले आहे. त्यावर पर्यायी उपाययोजनांचा अभ्यास चालू आहे.

अद्याप तर ऱ्हस्वदीर्घादींच्या फरकाकडे कानाडोळा करून शोध घेणेही शक्य नाही! मात्र त्यावर काही उपाय सापडला असून वेळ मिळेल तसा तो वापरात आणण्यात येईल.