काही घटनांची संगती लावता येत नाही आणि स्पष्टीकरणही देता येत नाही. मग आपण त्या 'योगायोग' किंवा कर्मधर्मसंयोग' या रकान्यात ढकलतो. त्यातून ते सुखद योगायोग असतील तर आपण काही काळ आश्चर्य व्यक्त करतो, काही काळ देवाचे आभार मानत राहतो आणि हळूहळू विसरून जातो. पण जर त्या थोड्याफार धक्कादायक घटना असतील तर मात्र त्या मनात दीर्घकाळ रेंगाळत रहातात आणि आपले मन त्यातून अतिमानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत राहाते.