मा. प्रशासक महोदय,

अशुद्ध लेखन व ते तसे प्रकाशित करणे याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. वास्तविक माझ्या शुद्धलेखनाची जाणीव असल्याने मी  चिकित्सक वापरतो पण यावेळी वापरला नाही. लेख अगदी लहान आहे तेव्हा चुका नसाव्यात हा फाजील आत्मविश्वास की तिडकीने लिहिल्याने ते लक्षात राहिले नाही अशी कुठलीही सबब पुढे न करता मी चूक मान्य करतो. यापुढे मी अधिक दक्ष राहीन. पुन्हा एकदा क्षमस्व आणि लेखन काढून न टाकता स्वतः श्रम घेऊन सुधारल्याबद्दल आभारी आहे

आपला

सर्वसाक्षी