@ मिलिंद फणसे, तुमचे मत मला अगदी पटले. मी पण इथे आजकाल येत नाही. मी काही कोणी लेखिका नाही. तरी प्रतिक्रिया देत होते. कधीतरी लिहीत होते. नंतर एकदा माझ्या लक्षात आले की माझी प्रतिक्रिया छापली जातच  नाही. आश्चर्याने प्रशासकांना विचारले तर उत्तरही नाही. कारण म्हणे प्रशासक उत्तर द्यायला बांधील नाहीत. २/३ वेळा असे झाल्यावर मी नाद सोडून दिला. सध्या मी 'मी मराठीं. नेट'ची मेंबर आहे. शिवाय इथे नवीन काहीच घडत नाही. कितीतरी दिवसांनी हे पेज उघडले तरी होम पेज वर त्याच त्याच कवितांची कडवी दिसतात. नवीन चर्चा, नवे गद्य लेखन फारसे दिसत नाही. त्यामुळे आजकाल इथे यावेसे वाटत नाही. मला तर सध्या इथे येताना माझा पासवर्ड पण पटकन आठवत नाही. असो! एक सांगायचे राहिलेच. कवी ग्रेस गेल्यावर मी त्यांच्या संबंधी ' ग्रेसफुल' ग्रेस ! या नावाने छोटेसे काही लिहिले होते. पण दुसऱ्या दिवशी 'ग्रेसफुल' या नावाऐवजी 'लालित्यपूर्ण' असा शब्द दिसला. कारण काय तर 'ग्रेसफुल' हा शब्द इंग्रजी आहे. वास्तविक या शब्दाला नेमका मराठी प्रतिशब्दच नाही. शिवाय मी तो शब्द देवनागरीत लिहून त्याला इन्व्हर्टेड कॉमा केला होता. त्या प्रकांड पंडित माणसाने जर स्वतःचे नाव 'ग्रेस' ठेवले होते तर इतरांना काय प्रॉब्लेम होता? त्यांना काय मराठीत टोपण नाव सापडले नाही ? पण अशा आडमुठ्या धोरणाने हळूहळू नाकारलेपण यायला लागले. असो! कोणाला दोष देण्याचा हेतू नाही. आपल्याला नाही आवडत, नाही पटत तर नाही येऊ.