या चर्चेतील प्रशासकीय हस्तक्षेप पाहता मनोगताचे "असे का? " झाले हे सहज कळून येण्याजोगे आहे. शुद्धलेखनाची सक्ती मला मान्य आहे कारण मनोगताने शुद्धलेखन चिकित्सा आणि स्वयंसुधारणा वगैरे सुरेख पर्याय दिले आहेत पण संकेतस्थळ हे लेखनाने बहरते आणि लेखनातील त्रुटी दाखवताना लेखकाचा उत्साह मारून टाकायचा नसतो, यंत्रमानवाप्रमाणे* सुचवणी न करता खुल्या दिलाने सुचवणी करणे शक्य असते हे प्रशासनाला लक्षात घ्यायचे नाही याचा वारंवार प्रत्यय येथले लेखन वाचले की होतो.
प्रतिसाद राहिला तर देव पावला.
* ग्रेसफुल ग्रेसचे "लालित्यपूर्ण" हे भाषांतर फक्त "रोबोट" (यंत्रमानव तर येथे चपखल बसणार नाही तेव्हा "सांगकाम्या" असे वापरता येईल) करू शकतो.