संकेतस्थलाचे तीन घटक आहेतः प्रशासक, लेखक आणि वाचक

पैकी प्रशासक लेखकांशी (किंवा सदस्यांशी) संवाद साधू शकत नसतील तर लेखकांना लिहायचे कशाला (आणि वाचकांना आपण इथे हवे आहोत का ?) असा प्रश्न पडतो.

वाचक प्रतिसाद द्यायला अनुत्सुक असतील तर त्यांना चांगलं वाचायला मिळण्याची शक्यता दुर्मिळ होते.

लेखक अंतरजालाचा आत्मा आहेत. त्यांनी उत्तम लिहावं यासाठी प्रशासकांनी त्यांना योग्य सवलती द्यायला हव्यात (म्हणजे लेखनाचा इंपॅक्ट काय आणि शीर्षकासाठी मराठीचा आग्रह किती, त्यांच्या व्य. नि. सुविधा, वगैरे). 

त्याच बरोबर वाचकांनी (आवडलं तर) लेखनाला प्रतिसाद द्यायला हवा. मनोगत प्रतिसाद दुर्मुख आहे.

प्रशासकांची धोरणं अति शिस्तीची आहेत. जर प्रतिसाद (आणि लेखन) संपादन करण्यापासून काढण्यापर्यंत सर्व अधिकार आहेत तर प्रत्येक शब्द प्रशासकीय चाचणीतून पास झाला पाहिजे हा हट्ट अनाठायी आहे.

इथे प्रत्येक गोष्टीला होणारी दिरंगाई आणि कधीकधी तर संपूर्ण अनास्था हे सध्याच्या परिस्थितीचं प्रमुख कारण आहे.

जे वाटलं ते लिहिलय, सुधारणा करायची की नाही हे सर्वांनी ठरवायच.