मराठीतूनच लिहिलं जातय पण कोणतिही भाषा लयाला जाण्याची दोनच कारणं आहेत
१) तिचा रोजच्यातला कमी होत गेलेला वापर आणि
२) इतर भाषिक शब्द स्वतःत सामावून न घेण्याचा दुराग्रह
तद्वत कोणतही संकेतस्थळ बंद पडत जाण्याची दोनच कारणं आहेत :
१) वाचकांचा त्या संकेतस्थळावर शून्य झालेला वावर आणि
२) लेखकांना त्या संकेतस्थळावर लिहावस न वाटणं
या दोन्ही कारणांसाठी काही करू शकणारी एकमेव यंत्रणा आहे - ती म्हणजे प्रशासन!
संकेतस्थळाचं अस्तित्व धोक्यात येण्याच्या भीतीनं प्रत्येक शब्द प्रकाशनपूर्व स्थितीत तपासला जावा आणि 'तुम्ही असा की जा' आम्हाला फरक पडत नाही हा दृष्टीकोन बदलला तर इथे काही चांगलं घडू शकेल. संकेतस्थळात पोटेंशियल नक्कीच आहे.
सभासदांना दडपायला ही काही शाळा नाही. तुमच्याकडे इतके अधिकार असताना संकेतस्थलाच्या अस्तित्वाचा पराकोटीचा विचारा केल्यानं इथे खुलेपणा राहिला नाही.
'आम्ही सर्वेसर्वा' यापेक्षा 'संवादानं निर्णय' हे धोरण स्विकारा पंधरा दिवसात सगळं चित्र बदलेल.