ही चर्चा संपन्न होण्यापूर्वी एक सांगावस वाटतं
भाषा टिकली तर शुद्धलेखनाला महत्त्व. भाषाच संपली तर शुद्धलेखन कसं टिकेल?
तसच एकमेव शुद्धीचिकत्सक असणारं हे संकेतस्थळ जर लेखकच लिहिनासे झाले तर लोक केवळ शुद्धलेखन तपासण्यासाठी वापरतील (आणि सध्या बऱ्याच लोकांच तेच चाललय).
लेखनाला नवनवीन विषय हवेत. संवादच नसेल तर विषय कसे मिळतील? प्रथम संवाद घडू द्या.
एखादा लेख किंवा प्रतिसाद संकेतस्थळाच्या योग्यतेचा नसेल आणि तो एखादा दिवस इथे दिसला तर त्यानं कितीसा फरक पडतो? दुसऱ्या दिवशी तो काढता येतो किंवा सदस्याला सूचनेसहित परत पाठवता येतो.
माझे इथे पासष्ठ लेख आहेत आणि त्यावर बेसुमार प्रतिसाद आहेत. या संकेतस्थळामुळे मला प्रसिद्धी मिळालीये पण इतक्या महत्त्वाच्या चर्चेत प्रशासक जर 'आम्ही बोलणार नाही, तुम्ही तुमचे अंदाज बांधा' अशीच वृत्ती ठेवणार असतील तर मग काय बोलणार?