अवैध सवंगडी ??

म्हणजे काय? माझ्या माहितीप्रमाणे 'वैध' किंवा 'अवैध' हे शब्द शब्द साधारणत: निर्जीव गोष्टींकरता वापरले जातात. उदा - अवैध कायदा, वैध नियम, अवैध मार्ग इत्यादी. सवंगडी म्हणजे एखादी व्यक्ती, ती वैध अथवा अवैध कशी काय असू शकेल? माझ्या मते 'अवैध सवंगडी' हे शोधसूत्रच मुळात चुकलेले आहे..व्यक्तिच्या बाबतीत पात्र-अपात्र असे शब्द वापरले जातात. 

माझे मराठी भाषेचे ज्ञान अल्प आहे. कृपया माहितीपर खुलासा करावा..

तात्या.