सर्वप्रथम अत्यंत समजूतदार प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही म्हणता,

वर सुचवल्याप्रमाणे प्रशासकांनी धोरणात थोडी लवचीकता आणली तर नक्कीच आनंद होईल

म्हणजे सध्या अजिबात लवचीकता नाही असे म्हणायचे आहे काय?
तसे मला वाटत नाही. धोरणे आणि भाषा कितीही ताठर आणि प्रसंगी कडवट असली तरी अंमलबजावणी तारतम्याने आणि लवचीकपणेच होत आहे असे मी पाहिलेले आहे. अशी धोरणे ताठरपणे राबवायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. ते दिवसभराचे काम होईल. जेथे अति होते तेथेच प्रशासक छापील प्रतिसाद देऊन प्रतिबंध करतात. एरवी बऱ्याच वेळा समजून घेतलेलेलेच दिसते (अहो तेच व्यवहार्य आहे )

दुसरी गोष्ट अशी की लवचीकता मोजायची कशी. ती आहे की नाही ते कसे पाहायचे?

काहीही असले तरी केवळ संस्थळाची लोकप्रियता वाढवत राहण्यासाठी प्रशासकांनी कुठल्याही असंस्कृत प्रवृतींना वाव दिला नाही याचा एक मनोगती म्हणून अभिमान वाटतो.

अगदी अगदी १०० टक्के सहमत

मनोगताविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्व सदस्यांना आग्रहाने सांगावेसे वाटते की कृपया नव्या लेखनावर नियमितपणे प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करा.

माझे ह्याला अनुमोदन.

धन्यवाद

-श्री. सर. (दोन्ही)