गेली काही वर्षे मी अमेरिकेत राहत असल्याने आपण मांडलेल्या प्रसंगाच्या वेळी मनात येणाऱ्या भावना मला नेमकेपणाने जाणवल्या. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना कुटुंबीय / मित्र / सहकारी भारतीय भाषेतून बोलले अन शेजारीच कुणी स्थानिक असले तरी बरेचदा अवघडल्यासारखे वाटते. कारण आपण नेमके काय बोलतो आहे याबद्दल स्थानिक व्यक्तीच्या मनात कुतूहल व शंका दोन्हीही उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे मी संवादाला इंग्रजीमध्ये वळवायला जमेल तेवढे प्रयत्न करतो. किमान काही इंग्रजी विशेषणे व नामे नक्कीच वापरतो जेणेकरून त्या स्थानिक व्यक्तीला कळावे की काहीही वावगे बोलणे सुरू नाहीये.
तुमची मुले अस्खलित मराठीमध्ये संवाद साधतात हे पाहून खूप बरे वाटले. कारण माझ्या परिचयातील जवळ जवळ सर्वच मुले जी भारताबाहेर जन्मलेली व वाढलेली आहे ती इंग्रजीतूनच बोलतात वा मराठीतून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरे देतात. त्यातही समाधानाची बाब अशी की त्यांना मराठी संवादांतील खाचाखोचा बहुतेक वेळा कळतात.
एक प्रसंग सांगतो. माझा भाचा ६ वर्षांचा असताना त्याचे वडील रागावताना म्हणाले ६ वर्षांचा घोडा झालायस तरी.... त्यावर त्याने लगेच उत्तर दिले 'ऍम नॉट अ हॉर्स' ; -).
बाकी वरील प्रसंगात त्या बाईंचेच अधिक चुकले असे वाटते. तिच्याजागी इतर कुणी असते तर हसत हसत विचारले असते 'व्हॉट इज हि आस्किंग? '.