प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,
अगदी खरं आहे तुमचं. दुसर्याला कानकोंडं वाटू नये म्हणून तसं करावंच लागतं. मोठ्यांना हे जमतं पण मुलांना आपल्याला हे सगळं स्पष्ट करावं लागतं त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत होते. आणि काही काही गोष्टी अंगात इतक्या भिनून जातात (जसं आईशी बोलताना, मराठीच) की दरवेळेला अरे, बाहेर आहोत. इंग्लिशमध्ये बोला असं सांगावं लागतं.
इथे वाढलेल्या मुलांची ही समस्या आहेच. म्हणजे बोललेलं समजतं, पण उत्तरं इंग्लिशमध्ये. आम्ही अमेरिकेत जिथे जिथे राहिलो तिथे सगळ्यांनाच आमच्या मुलांच्या मराठी बोलण्याचं फार कौतुक वाटतं. मुलगा तर आमच्या मित्रमैत्रीणींशी आता ’वाद’ ही घालतो मराठीतून :-). मला वाटतं, ’पेशन्स’ हे त्याचं उत्तर आहे. आम्ही मुलांनी इंग्लिशमध्ये उत्तर दिलं की ’काय? काय?’ असं विचारतो मग त्यांच्या लक्षात येतं आणि मराठी सुरु होतं. हा धडा आमच्यावरही उलटतो खूप वेळा.
मुलाच्म भारतात पूर्ण मराठी बोलण्याचं कौतुक होतं आहे तेव्हा आमच्या लक्षात आलं की तो पूर्ण मराठी तर पूर्ण मराठीच वापरतो पण आम्हीच बोलण्यात इंग्लिश शब्द जास्त वापरतो, काही काही वेळेस तर इतके सोपे शब्द असतात तरीही. जसं प्रॉब्लेम. अडचण हा शब्द आहेच की पण आधी समस्या आठवतं आणि मग तो योग्यं वाटत नाही त्यामुळे प्रॉब्लेम म्हटलं जातं. असे कितीतरी शब्द....
घोडा नाही.....असे विनोद सातत्याने होत असतात :-). माझा मुलगा अशा गमतीजमतीवर स्टॅड अप कॉमेडी करायचा पूर्वी.