अमेरिकन भाषेत "आय एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...."करिता "गुड फॉर यू!" हे एक अत्यंत प्रभावी, समर्पक आणि तत्काळ उत्तर आहे. कृपया विचार करून पाहावा. (पुढचा निबंध अनावश्यक.)

एक कुतूहल: बया रिपब्लिकन होती काय? नाही म्हणजे, त्या मंडळींना सहसा दुसऱ्यांच्या खाजगी भानगडींत नाक खुपसण्यात - त्याचा स्वतःसच विनाकारण त्रास करून घेण्यात, पण तरीही नाक खुपसण्यात - भयंकर रस असतो, असे निरीक्षण आहे, म्हणून विचारले. असो.

आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते  सौम्य शब्दात सगीतला असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी. तिच्या वयाकडे, मेहनतीकडे पाहून आमचा काही जीव धजावत नाही तिला काही बोलण्याचा किंवा ’फायर’ करण्याचा.  मनातल्या मनात निषेध करत माझं तिच्याबरोबर घर बघणं चालूच राहतं....

गरज काय तिच्यासाठी अपॉलॉजिस्ट (मराठी?) बनण्याची? तिचे वय, झालेच तर सध्याची अर्थव्यवस्थेची स्थिती, त्यांचा ताळमेळ वगैरेंचा हिशेब तिने करावा, तिला गरज असली तर. तुम्ही तो मक्ता घेतला आहे काय?

तुम्ही कस्टमर आहात. आवडली नाही एजंट तर यू कॅन फायर हर....
अतिशय योग्य सल्ला. स्रोताचा विचार न करताही मननीय. (एजंट तसेही बहुधा पुष्कळ उपलब्ध असावेत.)

याचसाठी केला होता अट्टाहास, त्याची काही गोड फळे तर काही कडू, एकाच नाण्याच्या दोन बाजू.....
कळले नाही. म्हणजे, 'माझा मुलगा गेले तीन आठवडे भारतात असून, तेथे त्याच्या मराठी संभाषणकौशल्याचे (कदाचित रास्त) कौतुक होत आहे' ही बाब अधोरेखित करण्याकरिता अगोदरच्या त्या विनसीपुराणाचे प्रयोजन होते, असे म्हणायचे आहे काय?