<<<"गुड फॉर यु..."? >>>तुम्ही असं केलं आहे की काय?

तशी गरज पडलेली नाही अजूनपर्यंत, पण तितकीच वेळ आली, तर करेनसुद्धा.

(१९९६च्या मला वाटते प्रेसिडेन्शियल डिबेट्समध्ये (याचे 'अध्यक्षीय वादविवाद' असे भाषांतर करणे कसेसेच वाटते. 'अध्यक्षीय वादविवादस्पर्धा' तर त्याहूनही!) एका श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना, श्रोत्याने प्रश्न विचारण्यापूर्वी स्वतःची ओळख करून देताना 'मी सध्या ऍम्वेचा धंदा करतो' असे विधान केले असता, अध्यक्ष (आणि पुन्हा एकदा अध्यक्षीय उमेदवार) श्री. बिल क्लिंटन यांनी हेच वाक्य, दूरचित्रवाणीच्या प्रतिमाग्राहकाच्या (मराठीत: टीव्ही कॅमेरा.) साक्षीने, जाहीररीत्या आणि खणखणीत आवाजात त्याच्या तोंडावर फेकलेले आजही आठवते. कितीही झाले तरी क्लिंटनमामांचा आदर्श आहे आमच्यासमोर.)

फायर करणं, न करणं ह्यात खूप गोष्टी गुंतलेल्या असतात आणि प्रत्येकाचा त्या त्या प्रसंगाला तोंड देण्याचा स्वभावही वेगवेगळा असतो.

ठीक आहे. आपली मर्जी. भोगा तर मग आपल्या (न)-कर्मांची फळे.

तुमचा गैरसमज झाला असेल तर दिलगीरी

स्वीकारली.