'एखाद्याचे समर्थन करणारा/री - कदाचित काहीशा रदबदलीच्या सुरात, परंतु समर्थन करणारा/री' अशाच अर्थाने तो शब्द वापरला होता.

असे असे. मग ठीक आहे. मला का कुणास ठाऊक तुम्हाला क्षमायाचक म्हणायचे असावे असे वाटले खरे. क्षमस्व.

कृपया येथे पाहावे. येथे दिलेल्या व्याख्येतील 'इन डिफेन्स ऑफ' हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत, असे वाटते. (या संदर्भात, 'सपोर्टर' अथवा 'ऍडवोकेट' विरुद्ध 'अपॉलॉजिस्ट' यांच्यात 'सपोर्ट' अथवा 'प्रमोट' विरुद्ध 'डिफेंड' यांच्या अर्थच्छटांतील सूक्ष्मफरक असावा. )

होय. हे आणि असे संदर्भ पाहिले होते.
धन्यवाद.
आता 'अपॉलॉजिस्ट'साठी काय शब्द जुळवता येईल बरे?