आत्ताच येथे पाहिले असता, 'अपॉलॉजी'चा अर्थ 'दिलगिरी' ('क्षमाप्रार्थना' नव्हे!) याव्यतिरिक्त 'सबब' (याचा 'क्षमाप्रार्थने'शी कदाचित दूरान्वयाने संबंध असावा.) आणि (मुख्य म्हणजे) 'बचाव' ('डिफेन्स') असाही होऊ शकतो, हे कळले.
(दुव्यावरील १अ, १ब आणि २ क्रमांकाच्या व्याख्यांची तुलना करावी. )
म्हणजे, अखेरीस 'अपॉलॉजी' आणि 'अपॉलॉजिस्ट' हेही जवळच्या नात्यातलेच शब्द असावेत तर.
आता 'अपॉलॉजिस्ट'साठी काय शब्द जुळवता येईल बरे?हम्म्म्म... नेमका प्रतिशब्द सुचत नाही खरा. कदाचित, 'गरज काय तिची रदबदली करण्याची? ' अशी काहीशी पर्यायी वाक्यरचना करून वेळ मारून नेता येईलही, परंतु त्यातून नेमकी हवी ती अर्थच्छटा वाचकापर्यंत पोहोचते किंवा कसे, याबद्दल साशंक आहे. शिवाय, त्यातून 'अपॉलॉजिस्ट'करिता नेमका मराठी प्रतिशब्द मिळत नाही, ते वेगळेच!