तारखेच्या बाबतीत आपणा सर्वांची तक्रार खरी आहे. हा लेख अर्धवट टंकलिखित अवस्थेत 
४/०९/२०११ पासून पडून आहे. खरंतर त्याकडे इतर लिखाणामुळे माझे दुर्लक्ष झाले . आणि नुकतेच टंकलिखित करण्यासारखे  फारसे काही
न दिसल्याने हा लेख सप्टेंबर २०१२ मध्ये टंकलिखित केला गेला. यात माझीच दिरंगाई असल्याने प्रशासकांना कृपया विचारू नये, ही विनंती. 
आपले सर्वांचे प्रतिसाद वाचले. त्याबद्दल आभारी आहे. मोठे व्यापारी त्यातून आपल्याला सुटल्यासारखे वाटतील , पण हा लेख सर्वच  लहान 
मोठ्या  व्यापाऱ्यांना लागू आहे , असे मला वाटते. बरेच दिवस मला बाजारातल्या सामान्य ग्राहकाच्या परिस्थितीवर कोणाला तरी सांगावेसे 
वाटायचे(किंबहुना तक्रार म्हणा) , म्हणून हे लिहिले गेले. थोडे विषयांतर करून सांगतो की आपण "डोंबिवली फास्ट " हा चित्रपट पाहिलाच 
असेल. त्यात थंडपेय थंड ठेवण्याचे दोन रुपये मागितले जातात. हा अनुभव मला स्वतःला हा चित्रपट पाहिल्या नंतर आला. तेव्हा विक्रेती 
एक स्त्री होती. पेय्याची जास्त किंमत पाहिल्यावर तिने हेच उत्तर दिले होते व मी तिला वरील चित्रपट पाहण्यासाठी सांगितले असता, 
"ते आम्हाला काही सांगू नका " असे म्हणाली असल्याचे मला आठवते. मला वाटतं कोणत्याही उपायांनी सुधारायचच नाही असं ठरवलेल्या 
व्यापाऱ्यांपुढे आपण भिकारी ठरतो, हेच खरं. इतका आपल्या गरजेवर सामाजिक दबाव असावा. असो. आपल्या सर्वांच्याच तपशीलवार 
प्रतिसादांमुळे बरं वाटलं. परत एकदा आभार.