सुचवण हा 'प्रशासकांचा' अगदी लाडका शब्द दिसतो.... पण हा मराठीत प्रचलित नाही
हेही खरे. ते सूचना अथवा प्रस्ताव अथवा विनंती असे (त्या त्या संदर्भा
प्रमाणे) शब्द का नाही वापरीत बरे?
सूचना (नोटीस), प्रस्ताव (प्रपोजल), विनंती (रिक्वेस्ट) ह्या शब्दांपेक्षा सुचवण (सजेशन) ह्या शब्दाची छटा वेगळी आहे. ती छटा नेमकी जमावी आणि खास मराठी धाटणीचा शब्द बनवावा असा विचार करून 'सुचवण' हा प्रतिशब्द मुद्दाम बनवण्यात आला. मनोगताव्यतिरिक्त इतरत्रही मराठी संस्थळांवर तो नंतर वापरला गेल्याचे कळले, तेव्हा तो आता सार्वत्रिकरीत्या वापरला जातो असे म्हणायला हरकत नसावी.
आठवणे - आठवण
शिकवणे - शिकवण
तसे
सुचवणे - सुचवण
असे म्हणून पाहावे.
स्वारस्याबद्दल धन्यवाद.