१) प्रशाकीय हस्तक्षेपः यावर अनेकांनी प्रतिसादातून लिहिल्यामुळे अधिक लिहत नाही.
२) विदागाराला झालेला अपघातः मनोगतचा डेटाबेस कोसळला तेव्हा मी मनोगतावरच काहीतरी वाचत होतो. म्हणजे मी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष साक्षीदार. एकादे संकेतस्थळ असे अपघातग्रस्त होणे ही त्याच्या यशाची पहिली पायरी असते. ट्विटरला देखील अशा अपघाताचा सामना करावा लागला होता. पण मनोगत त्यातून सावरलेच नाही.
३) ओपन सोर्सला विरोध: मनोगतावरील माझा वावर कमी झाला याला वर दिलेल्या कारणांसोबतच तांत्रिक बाजू आहे. मनोगत ड्रुपल या प्रणालीवर आधारीत असले तरी त्याच्या सोर्स कोडमध्ये बरेच बदल केले गेले आहेत. नवीन मॉड्यूल लिहीली गेली. ती कधीच बाहेर आली नाहीत. शुद्धलेखनाचे तंत्र API द्वारे इतरांना उपलब्ध करून देता आले असते. फुकट किंवा विकत कशाही प्रकारे तंत्रज्ञान शेअर झाले नाही. मी फक्त RSS फीड वाचतो. बहुतेक सर्व साईट्स अशा प्रकारे आपले लेख फीडमध्ये उपलब्ध करून देतात. मनोगतचा फीड पहिल्या काही महिन्यांनंतर गायब झाला. RSS फीडमुळे लेख चोरीला जातात असे कारण पुढे करणे हास्यास्पद आहे. मनोगताच्या कित्येक पट अधिक व्हॅल्यू असलेले विकिपीडिया / स्टेक ओव्हरफ्लो सारख्या साईट्स API, RSS फीड एवढ्यावर न थांबता आपलं पूर्ण विदागार सर्वांसाठी उपलब्ध करून देतात.